दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
जाधववाडी (फ), ता. फलटण, जि. सातारा येथील श्री अन्नपूर्णा देवी मंदीर येथे नवरात्री उत्सवाचे आयोजन ग्रामपंचायत सदस्य सौ. सारिकाताई संदिप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या उत्साहात योग्य नियोजनाने सुरू आहे. तसेच रोज महिलांसाठी वेगवेगळे तसेच गावातील ग्रामस्थांसाठी सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेले असून ग्रामस्थांनी तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवत तसेच या कार्यक्रमात भाग घेवून आनंद व्यक्त करीत आहेत.
शनिवारी नवरात्र उत्सवात सातवी माळ असल्याने श्री अन्नपूर्णा देवस्थान तसेच श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा दल तरडगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने जाधववाडी अन्नपूर्णा मंदिर तसेच संपूर्ण जाधववाडी येथे ग्र्राम स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याचे श्रेय ग्रामपंचायत सदस्य सौ. सारिकाताई संदीप चव्हाण यांच्या कल्पनेतून तसेच गावाच्या आरोग्यासाठी ही स्वच्छता मोहिम त्यांनी उत्तमरित्या राबविली. यासाठी त्यांना सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीने तसेच विशेष मार्गदर्शनाने जाधववाडी परीसरात अन्नपूर्णा मंदिर, साई मंदिर, गणेश मंदिर तसेच रंधवे वस्ती, बिरदेवनगर परीसर, जिल्हा परिषद प्र्राथमिक शाळा परिसर, गिरवी रोड ते जाधववाडी रोड वरील परिसर इ.ठिकाणी ग्र्राम स्वच्छता अभियान अंतर्गत संपूर्ण परीसर स्वच्छ व साफ केलेला आहे.
या मोहिमेसाठी जाधववाडी ग्रामस्थ तसेच अन्नपूर्णा मंदिर परिसरातील लोक यात सहभागी झाले. त्यांच्या या उपक्रमाबद्दल जाधववाडी येथील ग्रामस्थांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ. सारिकाताई संदिप चव्हाण यांना त्यांचे पती नायब तहसिलदार कोरेगाव श्री. संदिप चव्हाण यांनीसुध्दा मोलाची साथ दिली आहे. यासाठी सौ. सारीकाताई चव्हाण यांनी या ग्रामस्वच्छता अभियानात भाग घेतलेल्या सर्व ग्रामस्थांचे तसेच श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा दल यांच्या टीमचे विशेष आभार व्यक्त केले आहे.
यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सौ. सारीकाताई तसेच संदिप चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच सर्व जाधववाडी ग्रामस्थांनी यात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त मानले.