दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील ह.भ.प. सौ. कुसूमताई दत्तात्रय गावडे (सवई) (वय ७९) यांचे हृदयविकाराच्या आजाराने राहत्या घरी पंचबिघा येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी आणि सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गोखळी विकास सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय बाबुराव गावडे यांच्या पत्नी, गोखळी विकास सोसायटीचे माजी चेअरमन तानाजी बापू गावडे (सवई), श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन डॉ. शिवाजीराव गावडे (सवई) यांच्या मातोश्री होत. कुसूमताई यांना ‘ताई’ या नावाने परिसरात ओळखले जात. शांत, संयमी, धार्मिक, सामाजिक, दानशूर व्यक्तिमत्व होते.
राहत्या घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेमध्ये पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर जिल्ह्यातील नातेवाईक आणि राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कृषी, चित्रपट क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गोखळी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.