फलटणमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त विशेष कार्यक्रम; ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण येथे श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑक्टोबर : श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण येथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करत मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व व प्रेरणादायी जीवनविषयक मार्गदर्शन केले.

प्रतिमापूजन व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

कार्याचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांसाठी विशेष ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापकांनी घेतला.

मान्यवरांचे मार्गदर्शन व आवाहन

प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी फलटणच्या ऐतिहासिक परंपरेत नाईक निंबाळकर घराण्याचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या चरित्राचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. ग्रंथपाल पी. एस. तरटे यांनी ‘वाचाल तर वाचाल’ या म्हणीचे महत्त्व स्पष्ट करत वाचनामुळे विचारशक्ती कशी विकसित होते, याबाबत विचार मांडले. मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. अभिजीत कदम यांनी, मोबाईल व सोशल मीडियाच्या युगात विद्यार्थ्यांनी माहितीपेक्षा ज्ञान आत्मसात करण्यासाठी पुस्तकांच्या वाचनावर भर देणे गरजेचे असल्याचे सांगितले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी वाचनामुळे भाषेची समृद्धी आणि आकलनशक्ती कशी वाढते, यावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी दिक्षा चौगुले हिने केले, तर प्रा. एस. पी. तरटे व पी. डी. भगत यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!