मुधोजी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात; स्पर्धा परीक्षा विभागाला पुस्तकांची भेट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

मुधोजी महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला असून, यानिमित्त स्पर्धा परीक्षा विभागाला १७ पुस्तके भेट देण्यात आली आहेत.

स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑक्टोबर : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयातील मराठी विभाग आणि विवेकवाहिनीच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित विशेष व्याख्यान व पुस्तक भेट कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व आणि ज्ञाानाची महती सांगण्यात आली.

वाचन संस्कृती व मार्गदर्शक मनोगत

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. एच. कदम होते, तर प्रमुख वक्त्या म्हणून इंग्रजी विभागाच्या प्रा. सीता जगताप उपस्थित होत्या. यावेळी प्रा. सीता जगताप यांनी वाचन हे ज्ञानप्राप्तीचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात वाचनाची भूमिका अधोरेखित केली. “वाचनातून ज्ञान मिळवा, ज्ञानातून आयुष्य उज्ज्वल करा,” असा संदेश त्यांनी दिला. प्रास्ताविक व परिचय मराठी विभागप्रमुख प्रा. प्रभाकर पवार यांनी केला.

स्पर्धा परीक्षा विभागासाठी पुस्तकांची भेट

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्राचार्य पी. एच. कदम यांनी महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागासाठी १७ पुस्तके भेट दिली. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दर्जेदार वाचनसाहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावाव्यात, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. अशोक शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!