फलटणमध्ये बुधवार पेठ नवरात्रोत्सवात समशेरसिंह नाईक निंबाळकर उपस्थित; स्नेहाभोजनाचा घेतला आस्वाद

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

बुधवार पेठ नवरात्रोत्सव मंडळ दगडी फुल येथे माजी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट देऊन स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

स्थैर्य, फलटण, दि. १७ ऑक्टोबर : फलटण येथील बुधवार पेठ नवरात्रोत्सव मंडळ, दगडी फुल आयोजित नवरात्रोत्सवा दरम्यान माजी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी उत्सव मंडपास भेट दिली. याप्रसंगी त्यांनी श्रींच्या दर्शनानंतर महाप्रसाद आणि स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित

या सोहळ्यादरम्यान मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विकास कर्वे, अध्यक्ष केदार कर्वे, उपाध्यक्ष कन्हैया खंडागळे, अथर्व पवार, खजिनदार सुरज पवार, सागर दोशी, सेक्रेटरी प्रेम कर्वे आणि चैतन्य कर्वे उपस्थित होते.

नागरिकांची मोठी उपस्थिती

याप्रसंगी विठ्ठलराव आंबोले, अण्णा घाडगे, राजाभाऊ देशमाने, सागर शहा, फिरोज आतार, पोपट बर्गे, तानाजी कदम, पांढरे, पैलवान शंभुराज बोबडे यांच्यासह स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!