
थेट WhatsApp वर मिळवा
भारतीय बौद्ध महासभेतर्फे आढाववस्ती येथे १९ ते २८ ऑक्टोबर दरम्यान धम्म अभ्यास व आचरणासाठी श्रामणेर बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १७ ऑक्टोबर : भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा शाखा (पूर्व) च्या वतीने बीएसआय मिशन २५ अंतर्गत आढाववस्ती (गुणवरे), तालुका फलटण येथे भव्य श्रामणेर बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १९ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार असून बौद्ध उपासकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
धम्म प्रसार आणि अभ्यासावर भर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये घेतलेल्या धम्मदीक्षेला ७० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर धम्माचा सखोल अभ्यास, आचरण आणि प्रसारासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरातील श्रामणेर प्रवज्जा विधी पूज्य भंते धम्मानंद बोधीजी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. शिबिरार्थींच्या निवास, भोजन व फलाहाराची सर्व सोय आयोजकांकडून करण्यात आली आहे.
नोंदणीसाठी संपर्काचे आवाहन
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी आढाववस्ती येथील ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभत आहे. इच्छुकांनी नावनोंदणीसाठी अध्यक्ष नानासो मोहिते, सरचिटणीस सुनील कदम, कोषाध्यक्ष नंदकुमार शिंदे, हिशोब तपासणीस बाळासाहेब जाधव, संस्कार उपाध्यक्ष अविनाश बारसिंग, संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे आणि अनिल कांबळे यांच्याशी संपर्क साधावा.





