खासदार रणजितसिंह यांच्यासोबत उत्तमराव जानकर विशेष विमानाने फडणवीसांच्या भेटीला; अमित शहांची सुद्धा भेट घेणार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. १५ एप्रिल २०२४ | फलटण | सोलापूर जिल्ह्यातील नेते उत्तमराव जानकर हे आज सकाळी बारामती विमानतळावरून विशेष विमानाने उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शहा यांचे सुद्धा जानकर भेट घेणार आहेत.

सोलापूर जिल्ह्याचे नेते उत्तमराव जानकर यांच्या समवेत माढा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, जयकुमार गोरे हे सुद्धा आहेत.

आगामी माढा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उत्तमराव जानकर हे मोहिते – पाटील यांना साथ देणार असल्याबाबत त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर तातडीने ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घेऊन ना. अमित शहा यांची सुद्धा भेट ते घेणार आहेत. या भेटीनंतर उत्तमराव जानकर यांची भूमिका नेमकी काय असणार याकडे आता माढा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!