राजुरीच्या उपसरपंच विद्या बागाव यांचा राजीनामा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 16 जानेवारी 2024 | राजुरी | गावच्या उपसरपंच विद्या बागाव यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला असून त्यामुळे राजुरी गावामध्ये हळहळ व्यक्त करीत आहेत. विद्या बागाव यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करून राजीनामा दिला आहे. विद्या बागाव यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ठोस कामकाज केले आहे.

बागाव यांनी त्यांच्या कार्यकाळात रस्ते, बंदिस्त गटार, पिण्याचे पाणी, रोडलाईट, घरकुल, घरकुलासाठी शासकिय जागा, पेवर ब्लाँक, मंदिर परीसर सुशोभिकरण, मागास्वर्गीय वस्तीत सभामंडप, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर यांसह विविध लाभार्त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात त्यांना यश आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!