
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
कोळकी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि ‘काशीद बंधू सामोसेवाले’चे संस्थापक उमेश काशीद यांचे निधन झाले. त्यांच्यावर फलटण येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.
स्थैर्य, कोळकी, दि. ०८ नोव्हेंबर : कोळकी (ता. फलटण) ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि ‘काशीद बंधू सामोसेवाले’ या प्रसिद्ध ब्रँडचे संस्थापक उमेश मनोहर काशीद यांचे निधन झाले. त्यांच्यावर ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता फलटण येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
उमेश काशीद यांची अंत्ययात्रा कोळकी येथील नरसोबानगर परिसरातील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. त्यानंतर फलटणच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी पार पडतील.





