मते नेमकी कोणाची फुटली याचे आत्मपरीक्षण राजे गटाने करावे : अशोकराव जाधव

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मते नेमकी कोणाची फुटली याचे आत्मपरीक्षण राजे गटाने करावे, असा थेट सवाल फलटणचे नगरसेवक अशोक जाधव यांनी उपस्थित केला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २३ नोव्हेंबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मिळालेला विजय हा प्रत्यक्षात राजे गटाचा नैतिक पराभव असून त्यांनी हे वास्तव मान्य करावे, असे प्रतिपादन नगरसेवक अशोक जाधव यांनी केले आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील गटाची ताकद २९ मतांवरून थेट ६० मतांवर पोहोचली आहे. त्यामुळे या निवडणुकीत मते कोणाची फुटली, हे समजण्याइतपत फलटण तालुक्यातील जनता सुज्ञ असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

मतांच्या वाढीवरून आत्मपरीक्षणाचा सल्ला

राजे गटाला मिळालेला हा विजय जिव्हारी लागला असून ते आकड्यांचे गणित मांडून आपला पराभव लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, अशी टीका जाधव यांनी केली. मागील निवडणुकीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात लढलेले तुकाराम शिंदे यांना केवळ ९ मते मिळाली होती. त्यावेळी तालुक्यातील बहुतांश सोसायट्या राजे गटाच्या ताब्यात होत्या. मात्र यंदा समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी तब्बल ६० मते मिळवली आहेत. त्यामुळे या वाढलेल्या मतांवरून राजे गटाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

आगामी स्थानिक निवडणुकांबाबत रणनीती

तालुक्यातील आगामी ग्रामपंचायती व विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुका खासदार गट ताकतीने लढणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. संपूर्ण फलटण तालुका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, हेच या निवडणुकीच्या निकालावरून सिद्ध झाल्याचे नगरसेवक अशोक जाधव यांनी सांगितले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!