दिवंगत नंदकुमार मोरे यांच्या ५४ व्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये विशेष सन्मान सोहळा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दिवंगत नंदकुमार मोरे यांच्या ५४ व्या जयंतीनिमित्त फलटण येथे रविवारी सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०८ नोव्हेंबर : दिवंगत नंदकुमार संभाजी मोरे यांच्या ५४ व्या जयंतीनिमित्त फलटण येथे रविवारी सायंकाळी ५ वाजता विशेष अभिवादन व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पिरामिड चौक, भडकमकर नगर परिसरातील स्वरा टॉवर येथील एमके फॅशन हबमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.

सामाजिक योगदानाला उजाळा

नंदकुमार मोरे यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचे स्मरण या कार्यक्रमातून केले जाणार आहे. त्यांच्या स्मृती समाजासाठी सदैव प्रेरणादायी राहाव्यात, या उदात्त हेतूने या अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मान्यवरांचा होणार सन्मान

या विशेष प्रसंगी पत्रकारिता, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध मान्यवरांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहून दिवंगत नंदकुमार मोरे यांच्या स्मृतींना अभिवादन करावे, असे आवाहन लखन मोरे आणि कपिल मोरे यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!