उमाजी नाईक स्मारकाचे सुशोभीकरण होईपर्यंत सत्कार नको; नगराध्यक्ष समशेरसिंह यांची भूमिका

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी स्मारकाच्या सुशोभीकरणाबाबत स्पष्ट भूमिका मांडली.

स्थैर्य, फलटण, दि. 11 सप्टेंबर : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी आलेले नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेला सत्कार स्वीकारण्यास नकार दिला. उमाजी नाईक यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत श्रीफळ आणि हार स्वीकारणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्मारकासाठी उपलब्ध करून दिला निधी

उमाजी नाईक स्मारकासाठी काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे जयंतीनिमित्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार मानण्यासाठी सत्काराचे नियोजन केले होते.

सुशोभीकरण पूर्ण झाल्यानंतरच स्वीकारणार सत्कार

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार करण्याची तयारी केली असता समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी तो नम्रपणे नाकारला. उमाजी नाईक यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पूर्ण झाल्याशिवाय श्रीफळ आणि हार स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!