• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणाऱ्या उल्हासनगरमधील तरुणीला अटक

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
मार्च 16, 2023
in देश विदेश

दैनिक स्थैर्य । दि. १६ मार्च २०२३ । उल्हासनगर । विविध गुन्हात फरार असलेला माजी नगरसेवक अनिल जयसिंघानी यांच्यावरील गुन्हे व आरोप मागे घेण्यासाठी जयसिंघानी यांची मुलगी अनिष्का हिबे थेट उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मुंबई मधील मलबारहिल येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गुरवारी दुपारी पोलिसांनी तीला अटक केली. यापूर्वीही राष्ट्रपती, सर्वाच्च न्यायालयाचे न्यायाधिश आदींना गुजरात मधून समन्स पाठविणाराही उल्हासनगरचा असल्याचे उघड झाले होते.

उल्हासनगर येथील माजी नागरसेवक व क्रिकेट बुक्की अनिल जयसिंगानी हे विविध गुन्हे प्रकरणी फरार आहेत. त्यांच्या अनिष्का नावाच्या मुलीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग करून १ कोटींची ऑफर देत वडीलावरील गुन्हे मागे घेण्याचा दबाव टाकला. आपल्यासह पती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडकविण्याचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यावर, अमृता फडणवीस यांच्या तक्रारीवरून मुंबई येथील मलबार हिल येथील पोलीस ठाण्यात अनिष्का जयसिंगांनी हिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.

गुरवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती विधानसभेत दिल्यावर एकच खळबळ उडाली. दुपारी मलबार हिल पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने जय सिंगांनी यांच्या उल्हासनगर येथील घराची झडती घेऊन अनिष्काला अटक केली. याप्रकारने खळबळ उडाली असून प्रकारात स्थानिक नेत्यांचा सहभाग आहे का? याबाबत चौकशी करण्याचे संकेत पोलिसांनी दिले. अनिल जयसिंगांनी यांच्यावर क्रिकेट बुक्कीसह विविध पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून ते फरार आहेत. अनिल जयसिंगांनी यांच्यावरील गुन्हे कमी करण्यासाठी मुलगी अनिष्काने हे कृत केल्याचे बोलले जात आहे. यामध्ये स्थानिक राजकीय नेत्यांच्या सहभाग आहे का? याबाबत चौकशीचे संकेत पोलिसांनी दिले.

  राष्ट्रपती, सर्वाच्च न्यायाधीशांना समन्स 
गुजरात न्यायालयातून थेट राष्ट्रपती, सर्वाच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदींना समन्स काढल्याचा प्रकार काही वर्षांपूर्वी घडला होता. समन्स काढणारा इसम उल्हासनगर मधील बडा इसम असल्याचे उघड झाल्यावर एकच खळबळ उडून गुन्हा दाखल झाला होता. याप्रकाराने पुन्हा खळबळ उडाली आहे. अमृता फडणवीस यांना अनिष्का नावाच्या महिलेनं अप्रत्यक्षरित्या धमकावून, कट रचून 1 कोटींची लाच ऑफर करण्याचा प्रयत्न केला होता.


Previous Post

बॅगेत पैसे भरले अन् माझ्या बंगल्यावरील…; देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला

Next Post

१९,४७९ कोटी रुपये खर्चून तयार होणार १०२ ‘वंदे भारत’ ट्रेन; भारतीय रेल्वेचा खास प्लान

Next Post

१९,४७९ कोटी रुपये खर्चून तयार होणार १०२ 'वंदे भारत' ट्रेन; भारतीय रेल्वेचा खास प्लान

ताज्या बातम्या

वडूज ता. खटाव येथील रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीतील कार्यकर्ते

रिपब्लिकन पक्षाच्या सन्मानासाठी खटाव शेती बाजार समितीच्या रिंगणात – गणेश भोसले

मार्च 30, 2023

मातृभाषेसाठी एकत्र येऊन काम करू – उद्धव ठाकरे

मार्च 30, 2023

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा

मार्च 30, 2023

तर डॉक्टरांवर बुट पॉलिश अन् भाजी विकण्याची वेळ; विधेयकाविरुद्ध डॉक्टर रस्त्यावर

मार्च 30, 2023

“पुण्याची ताकद गिरीश बापट”, हजारोंच्या समुदायात गिरीश बापट यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मार्च 30, 2023

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने प्रियदर्शनी राजा सम्राट अशोक यांचा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न

मार्च 30, 2023

राज्यात सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत अत्याधुनिक महासंग्रहालय उभे केले जाईल – मुनगंटीवार

मार्च 30, 2023

कोळकीच्या नागरिकाची रस्ता डांबरीकरणासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन तक्रार; ग्रामविकास अधिकार्‍यास धरले धार्‍यावर

मार्च 30, 2023

गोखळी येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा

मार्च 30, 2023

घरकुल योजनेत भ्रष्टाचार; ५ हजार रुपये घेऊन होतेय लाभार्थ्याची निवड; ग्रामसेवकासह ग्रामपंचायत पदाधिकारी खात आहेत कमिशन

मार्च 30, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!