
दैनिक स्थैर्य । दि. २६ मे २०२२ । सातारा । लोणंद- सातारा रोडवर तांबवे ता.फलटण गावच्या हद्दीत शासकीय धान्य गोदामापासून काही अंतरावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीवरून लोणंद येथील युवक ऋषिकेश प्रदीप कानडे वय २२ हा इलेक्ट्रिशियनचे काम करणारा युवक दुपारच्या वेळी तांबवे परिसरातील आपले काम संपवून दुचाकीवरून लोणंद येथील आपल्या घराकडे येत असताना त्याला तांबवे गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन मयत झाला आहे. लोणंद पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सदर घटनेची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात संध्याकाळपर्यंत करण्यात आलेली नव्हती.