स्कार्पिओच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी


दैनिक स्थैर्य । दि.१७ फेब्रुवारी २०२१ । सातारा । येथील पोवई नाका परिसरात अज्ञात स्कार्पिओने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  सातारा येथील पोवई नाका परिसरात असणाऱ्या सातारा रहिमतपूर मार्गावर बोकील लॅबजवळ दि. १५ रोजी साडे आठ वाजण्याच्या सुमारास शामू बापू पवार, वय ३० रा. शनिवार पेठ, सातारा हे दुचाकीवर बसलेले असताना दुचाकीला पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते जखमी झाले. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Back to top button
Don`t copy text!