

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथील अहिल्यादेवी होळकर चौकात भाजप नेते आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
स्थैर्य, फलटण, दि. ३१ मे : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज फलटण शहरात मोठ्या उत्साहात अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये जाऊन अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या अभिवादन कार्यक्रमास फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, नगरसेवक संदीप चोरमले, अशोकराव जाधव, सुदाम मांढरे, रोहित नागटिळे, सचिन अहिवळे, सौ. सुपर्णा अहिवळे, सौ. मीना काकडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव पोकळे, ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले, पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे आणि युवा नेते तुकाराम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी फलटण शहरातील नागरिक, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि शेकडो मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचे स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली.
