नागेवाडी येथे अपघातात १ ठार; पिकअपला कारची जोरदार धडक : एक गंभीर जखमी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि.१७ फेब्रुवारी २०२१ । सातारा । पुणे बेंगलोर महामार्गावर नागेवाडी गावच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअपला आपला मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात इतका भयानक होता की एकाचा पाय तुटून रस्त्यात पडला होता. घटनास्थळी रक्ताचा सडा पडल्याने एकच गर्दी होऊन वाहतुकीचा खोळंबा झाला.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की बुधवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान महामार्गावर नागेवाडी गावच्या हद्दीत सातारा कडून पुण्याला जाणाऱ्या लेन वर एक पीक अप बंद अवस्थेत उभी होती. या पिकपच्या चाकाचे पंक्चर काढण्याचे काम सुरू होते. यावेळी मागून आलेल्या एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने पिकप मधील एक जण जागीच ठार झाला तर एक एक जण गंभीर जखमी झाला

या अपघातात पिकपचे नुकसान झाले मात्र हा अपघात इतका भयंकर होता घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. एकाचा पाय तुटून रस्त्याच्या मधोमध पडल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना भयावह दृश्य पाहायला मिळाले बचावासाठी नागरिकांची एकच धावपळ सुरू झाली. घटनेची खबर सातारा तालुका पोलिसांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. पिकपमधील मयत आणि जखमी कोणी याची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.

Back to top button
Don`t copy text!