दैनिक स्थैर्य । दि. १७ एप्रिल २०२३ । बारामती । बारामती तालुक्यातील सावळ येथील श्री हनुमान यात्रा कार्यक्रमा निमित्त आयोजित तमाशा च्या मानाचा नारळ फोडण्याचा लिलाव वेळी श्री.सचिन अप्पासो आवाळे यांनी दोन लाख एकावन्न हजार ची बोली बोलून व ती रक्कम देऊन मानाचा नारळ फोडण्याचा मान सलग सहाव्या वर्षी नारळ फोडून मिळवला आहे.दि १५ व १६ एप्रिल रोजी श्री हनुमान यात्रा असल्याने तमाशा चा लिलाव साठी बोली चा कार्यक्रम प्रसंगी खरेदी विक्री संघाचे चेअरमन दत्तात्रय आवाळे, ग्रामपच्यात माजी सरपंच विठ्ठल आटोळे, माजी सरपंच रमेश साबळे, प्रवीण आटोळे, संतोष आटोळे, माजी उपसरपंच दत्तात्रय जगन्नाथ आवाळे, रयत कॉ.बँकेचे माजी संचालक ईशवर आवाळे सर ,माजी रजिस्ट्रार अंकुश आवाळे व देवस्थान ट्रस्ट चे पदाधिकारी आणि यात्रा उत्सव पंच कमिटी,ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्तीत होते. मानाचा नारळ फोडून देवाप्रति असलेली भक्ती या माध्यमातून दाखवली जाते व ग्रामस्थांना उत्कृष्ट मनोरंजन पाहता यावे या साठी प्रत्यनशील असल्याचे सचिन आवाळे यांनी सांगितले.
सावळ ग्रामस्थांच्या वतीने सचिन आवाळे यांचा सत्कार करण्यात आला.