
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा

स्थैर्य, नागठाणे, दि. २६ : ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावर खोडद फाटा (ता. सातारा ) येथे हाॅटेल अष्टविनायक समोर अॅकसेस दुचाकी रस्ता क्रॉस करत असताना महामार्गावर ईनोवा कारने जोरात धडक दिली.नंतर ही इनोव्हा महामार्गालगत हाॅटेल समोर उभ्या असलेल्या मालट्रक वर जाऊन आदळली. शुक्रवारी सायंकाळी हा अपघात झाला.
या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले तर एक किरकोळ जखमी झाला.जखमींची नावे समजू शकली नाहीत. हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग ईनचार्ज दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, धनाजी घारे व बोरगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ,पोलीस किरण निकम,मनोहर सुर्वे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून सातारा येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले.



