पाण्याचा अंदाज न आल्याने वैनगंगा नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू


स्थैर्य, गोंदिया, 07 : गोंदियामध्ये दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. वैनगंगा नदीपात्रात पोहोण्यासाठी हे दोघे मित्र गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही एकावेळी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये एकाला वाचवण्यात यश आलं असून दुसऱ्या दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे. गोंदिया जिल्ह्यात कवलेवाडा गावाजवळ असलेल्या नदीमध्ये अंघोळीला तिघे मित्र गेले होते. खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघं पाण्यात बुडाली.

नाका, तोंडात पाणी गेल्यामुळे आणि श्वास घेता न आल्यामुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे तर एकाला वाचवण्यात आलं आहे.

हे तिरोडा तालुक्यातील काचेवानी इथल्या रेल्वे वसाहतीमधील रहिवासी असून मृतांमध्ये सोना चल राठोड (वय 21वर्ष) आणि उमंग क्षीरसागर  (वय 18 वर्ष) या दोघांचा मृत्यू झाला आहे, तर भरत जांभूळकर वय 19 वर्ष हा मुलगा बचावलेला आहे. स्थानिकांकडून तात्काळ पोलिसांनी प्राचारण करण्यात आलं असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पोलिसांनी नदीपात्रातून दोघांचा मृतदेह बाहेर काढला असून तो शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय तिरोडा इथे पाठवण्यात आला आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली याचा पोलीस सध्या तपास करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!