जिल्ह्यात आज 14 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज; 97 नागरिकांचे घशातील नमुने कोरोना तपासणीसाठी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा दि. 7 : कोरोनामधून पूर्णपणे बऱ्या झालेल्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथून 1, बेल एअर हॉस्पीटल पाचगणी येथून 3, कोरोना केअर सेंटर खावली येथून 1, रायगावमधून 2 व वाई येथुन 4, मायणी मेडीकल कॉलेज येथून 3 अशा एकूण 14 कोरोनमुक्त नागरिकांना आज दहा दिवसानंतरघरी सोडण्यात आल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

97 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालस, सातारा येथील 8, शिरवळ येथील 39, कोरोना केअर सेंटर पानमळेवाडी येथील 13 व मायणी येथील 21 व महाबळेश्वर येथील 16 अशा 97 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने नमुने तपासणीसाठी, पुणे येथे पाठविण्यात आले  आहेत, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!