आठ वर्षापूर्वीचे खुनातील दोन फरारी आरोपींना अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 03 मे 2024 | फलटण | आठ वर्षा पूर्वी राजाळे परिसरात घडलेल्या खूनाच्या घटनेतील दोन फरारी आरोपींना अट करण्यात फलटण ग्रामीण पोलीसांना यश आले आहे.

याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आठ वर्षापूर्वी राजाळे परिसरात खूनाची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा 79/16 कलम 302,143,145,147 149 दाखल झाला होता. यातील तीन आरोपी अटक झाले होते पण बाकी दोन आरोपी फिरस्ते असलेमुळे मिळून येत नव्हते. पोलीसांनी त्यांना पकडण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले होते परंतु प्रत्येक वेळी ते पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जात होते. दरम्यान सदर आरोपी दत्त्या बिस्कुट्या भोसले वय 45 रा. राजाळे, वैशी उर्फ राजश्री दत्या भोसले वय 40 यात्रेनिमित राजाळे येथे आले असलेची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना मिळाली. त्यांनी तात्काळा पीएसई गोपाळ बदाने, नितीन चातुरे, अमोल जगदाळे, तात्या कदम, हनुमंत दडस, वैभव सूर्यवंशी, महिला पोलिस कर्णे यांना पाठवून आरोपींना राजाळे येथून ताब्यात घेऊन अटक केली.

निवडणूक काळात प्रत्येक फरारी आरोपींना अटक करा असे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक अंचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे आरोपींना अटक करण्यास ग्रामीण पोलिस प्राधान्य देत आहेत. निवडणूक जाहीर झालेपासून ग्रामीण पोलिसांना 5 फरारी आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे.


Back to top button
Don`t copy text!