आषाढी वारीतील दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 15 जून 2025 । पुणे । आषाढी एकादशी यात्रा 2025 करिता मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1 हजार 109 दिंड्यांना प्रती दिंडी 20 हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

गतवर्षी आषाढी एकादशी यात्रा सन 2024 करिता मानाच्या 10 पालख्यांसोबत येणार्‍या प्रत्येक दिंडीला 20 हजार रुपये इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार 2023-24 मध्ये विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडून एकूण 1 हजार 109 दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती.

यावर्षीदेखील दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार रुपये याप्रमाणे एकूण 2 कोटी 21 लाख 80 हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे बैठक घेऊन पालखी सोहळ्यासाठी वारकर्‍यांना उत्तम सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनीदेखील आवश्यक सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे. प्रशासनातर्फे व्यापक स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील प्रत्येक दिंडीला 20 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याने दिंडीतील वारकर्‍यांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होऊ शकतील.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!