पोलीस बॉईज असोसिएशनच्या फलटण तालुका अध्यक्षपदी तुलसीदास बडवे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 18 डिसेंबर 2023 | फलटण | पोलीस बॉईज असोसिएशनच्या फलटण तालुका अध्यक्षपदी तुळशीदास विलास बडवे यांची निवड शिंगणापूर देवस्थान येथे संघटनेचे संस्थापक रविभाऊ वैद्य, प्रदेशाध्यक्ष विकासभाऊ सुसर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष रोहित जीओंबासे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष आरिफ शेख व पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संजय (नाना) दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवड करण्यात आली.

महाराष्ट्रातील पोलीस आणि जनतेच्या न्याय हक्कांसाठी संघटना नेहमीच लढत असते.या संघटनेमुळे पोलिसांच्या मुलांना पोलीस भरतीमध्ये ५℅ टक्के आरक्षण व रनिंग मध्ये ५० सेकंद वाढवून दिले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात काम करणारी ही राज्यातील एकमेव संघटना आहे.

ही निवड करतेवेळी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संजय (नाना) दराडे, बारामती शहराध्यक्ष शितल शहा, कोषाध्यक्ष विनीत किर्वे, श्वेता डोंगरे, नंदिनी गुंदेचा, अँड. मेघराज नालदे, अँड. ओंकार इंगुले, पत्रकार माधव झगडे, अनिल बडवे, महेश बडवे,नागेश बडवे, धनंजय बडवे, रोहित बडवे,चिन्मय बडवे व शिंगणापूर देवस्थानचे पुजारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!