‘सनी अहिवळेंच्या कामावर विश्वास ठेवून संधी द्या!’ प्रभाग २ मध्ये सुपर्णा अहिवळे यांचे आवाहन; ‘नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे आणणार’!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. २९ नोव्हेंबर : प्रभाग क्रमांक २ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. सुपर्णा सनी अहिवळे यांनी आपल्या प्रचारात पती माजी नगरसेवक सनी अहिवळे यांच्या कामाचा दाखला दिला आहे. नागरी सुविधा आणखीन प्रभावीपणे आपण प्रत्यक्षात आणू, असे आश्वासन देत त्यांनी मतदारांकडे संधीची मागणी केली आहे.

सौ. सुपर्णा अहिवळे यांनी मतदारांना सांगितले की, माजी नगरसेवक सनी अहिवळे यांनी केलेल्या कामाचे तुम्ही साक्षीदार आहात. प्रभागाच्या विकासातील त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या कार्यावर आणि तुमच्या विश्वासावरच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

त्यांनी स्पष्ट केले की, निवडून आल्यास आपल्याला आपल्या भागात आणखीन चांगल्या सुविधा उभ्या करायच्या आहेत. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांची गुणवत्ता वाढवण्यावर त्यांचा मुख्य भर राहील.

एकंदरीत, सौ. सुपर्णा अहिवळे यांनी मागील कामांचा वारसा आणि मतदारांचा विश्वास या दोन मुद्द्यांवर आपला प्रचार केंद्रित केला आहे. प्रभागाचा विकास अखंडित ठेवण्यासाठी त्यांनी मतदारांची साथ मागितली आहे.

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!