राजाळे येथे वृक्षारोपण व स्नेहभोजनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 28 जुलै 2024 | फलटण | श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे, श्री जानाई हायस्कूल व जुनिअर कॉलेज राजाळे येथे शिक्षण सप्ताह निमित्त संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ संचलित ज्ञानेश्वर माऊली पायी वारी दिंडी राजाळे यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व प्रशालेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम प्रशालेच्या आवारात मान्यवरांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या स्नेह भोजनासाठी मंडळाचे पोपटराव शेडगे, नामदेवराव ननावरे, किसनराव भोईटे, देवीदास मोरे गुरुजी, श्रीमती सुमन तोरशे, लालासाहेब शेडगे, शरद पवार, बबन सावंत यांनी स्नेह भोजनाचे नियोजन केले होते.

या स्नेहभोजनाचा लाभ प्रशालेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी घेतला. प्रशालेच्या प्राचार्या सौ. गायकवाड, प्रर्यवेक्षीका श्रीमती काकडे यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंबाळकर यांनी व आभार बाचल यांनी मानले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!