ट्रान्सफॉर्मर चोरीचा मोठा कट उघडकीस; फलटण पोलिसांकडून दोघांना अटक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण ग्रामीण पोलिसांनी ट्रान्सफॉर्मर चोरीप्रकरणी दोन सराईतांना ताब्यात घेतले असून पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०९ सप्टेंबर : फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत रेकॉर्डवरील दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पाच ठिकाणच्या चोऱ्या उघडकीस आणल्या असून चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

संशयितांकडून गुन्ह्यांची कबुली

परिसरात ट्रान्सफॉर्मर चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते. तपासादरम्यान संशयित राज मिथुन शिंदे (रा. राजाळे, ता. फलटण) आणि सनी रमन भोसले (रा. सरडे, ता. फलटण) यांना ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशीत त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

शेतकरी वर्गाला मोठा दिलासा

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मागील एका महिन्यात ट्रान्सफॉर्मर आणि मोटार चोरीचे तब्बल १९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!