निरा नदीच्या खोऱ्यात असणाऱ्या धरणांचा आजचा पाणीसाठा; वाचा सविस्तर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 22 जून 2025 । फलटण । धोम – बलकवडी, नीरा – देवघर, वीर व गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. पावसाने दमदार सुरुवात केल्याने सर्व धरणे भरतील अशी अपेक्षा आहे.

नीरा खोर्‍यातील धरणातील पाणी पातळी पुढील प्रमाणे – 23 टीएमसी क्षमतेच्या भाटघर धरण परिसरात आज सकाळी संपलेल्या 24 तासात 4 मि. मी. पाऊस झाला, आजपर्यंत 231 मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात 4.81 टीएमसी म्हणजे 20.47 टक्के पाणीसाठा आहे.

10 टीएमसी क्षमतेच्या वीर धरण परिसरात आज सकाळी संपलेल्या 24 तासात 0.00 मि. मी. पाऊस झाला असून आजपर्यंत 134 मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात 8.21 टीएमसी म्हणजे 87.26 टक्के पाणीसाठा आहे.

12 टीएमसी क्षमतेच्या नीरा – देवघर धरण परिसरात काल 20.00 मि. मी. पाऊस झाला असून आजपर्यंत 414 मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात 2.75 टीएमसी म्हणजे 23.44 टक्के पाणी साठा आहे.

4 टीएमसी क्षमतेच्या गुंजवणी धरण परिसरात काल 25 मि. मी. पाऊस झाला असून आजपर्यंत 592 मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात 1.59 टीएमसी म्हणजे 43.08 टक्के पाणी साठा आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!