
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण : रामबाग, फलटण येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ३८ व १० वर्षीय पुरुष/मुले तसेच ६२ व ३८ वर्षीय महिला यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. त्या सोबत जिंती नाका, फलटण येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील १२, २० व ५९ वर्षीय मुले/पुरुष तसेच १६, १७ व ३५ वर्षीय मुली/महिला यांची कोविड चाचणी पाॅसिटीव्ह आलेली आहे. स्वामी विवेकानंदनगर, फलटण येथील ६४ वर्षीय पुरुष तसेच सोमवार पेठ, फलटण येथील ५२ वर्षीय पुरुष यांची कोविड चाचणी पाॅसिटीव्ह आली असून आज दिवसभरात एकूण १२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.
