दैनिक स्थैर्य । दि. ०१ मे २०२३ । बीड । अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ शाखा बीडच्या वतीने भव्य दिव्य सामूहिक विवाह सोहळा , नाथ दीक्षा कानचीरा हा कार्यक्रम महासंघाच्या वतीने दिनांक ५/५/२०२३ शुक्रवार रोजी बीड येथे आयोजित केला आहे
अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ शाखा बीडच्या वतीने भव्य दिव्य सामूहिक विवाह सोहळा आणि नाथ दिक्षा कार्यक्रमात सहभागी व्हावे कारण विवाह आणि नाथ दिक्षा हे कार्यक्रम अतिशय खर्चिक असून हा समाज गरीब आणि माधुगिरी मागुन आपला उदरनिर्वाह करीत आहेत. म्हणून ही संधी महासंघाचे अध्यक्ष, सचिव इतर सर्व कार्यकर्ते यांनी उपलब्ध करून दिली आहे याचा फायदा समाजाने घ्यावा असे महासंघाचे कार्याध्यक्ष मा. श्री संजय सावंत यांनी आवाहन केले आहे.