गोविंद दूध डेअरीसमोरून चोरीस गेलेल्या तीन दुचाकी चोरट्यांकडून हस्तगत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण शहरातील गोविंद दूध डेअरी, पंढरपूर रोड येथून चोरीस गेलेल्या तीन मोटारसायकली सीबी शाईन नं. एमएच-११-सीएल-०२६९, दुसरी दि. २० मे २०२४ रोजी चोरीस गेलेले सीबी युनिकॉर्न मोटारसायकल नं. एमएच-११-बीयु-५९९१ व दि. १३ मार्च २०२२ रोजी चोरीस गेलेली एचएफ डिलक्स मोटारसायकल नं. एमएच-११-बीजे-८०६७ या सर्व मोटारसायकली फलटण शहर पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केल्या आहेत.

या मोटारसायकली माळशिरस पोलिसांनी ४ एप्रिल २०२४ रोजी तपासात जप्त केल्या होत्या. त्या तिन्ही मोटारसायकल फलटण शहर पोलिसांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात आणल्या आहेत. या चोरी प्रकरणी गणेश बाळासो जाधव (वय १९ वर्षे, रा. जाधववाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) आणि अनिल उर्फ संदीप दिलीप लोंढे (वय २५ वर्षे, रा. मेडद, तालुका माळशिरस) यांना अटक करण्यात आली होती.

या गुन्ह्याचा तपास फलटण शहरच्या महिला पोलीस हवालदार हेमा पवार करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!