फलटण एज्युकेशन सोसायटीच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीचा ७३ वा वर्धापन दिन तथा मुधोजी दिनानिमित्त सर्व शाखांमधून सन २०२३ – २४ या वर्षात विशेष गुणवत्ता प्राप्त शाखा, राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक व खेळाडू, गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त सेवकांचा सत्कार समारंभ रविवार, दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता अनंत मंगल कार्यालय, शिंगणापूर रोड, फलटण येथे आयोजित केला आहे.

या समारंभाचे अध्यक्षस्थान विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार व फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे भूषविणार आहेत, तर भारती विद्यापीठ, अभिमत विश्वविद्यालय, पुणेचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न होणार आहे. यावेळी आमदार दीपक चव्हाण, गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष प्राचार्य विश्वासराव देशमुख, जगजीवन हिरजी मिस्त्री, अशोक दोशी, हेमंत रानडे, रमणलाल दोशी, अरविंद निकम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन फलटण एज्युकेशन सोसायटीकडून करण्यात आले आहे.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!