
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण : मौजे गुणवरे येथील पूर्वी पाॅसिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ६३ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पाॅसिटीव्ह आली आहे. मौजे सरडे येथील २८ वर्षीय महिलेची कोविड चाचणी पाॅसिटीव्ह आली आहे. पुणे येथून मलठण येथे आलेल्या ५८ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पाॅसिटीव्ह आली आहे. निकट संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.