मोगराळे घाटाच्या पायथ्याशी मळीचा टँकर गोठ्यात घुसल्याने तीन जर्सी गाई ठार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
दुधेबावी गावच्या हद्दीत मोगराळे घाटाच्या पायथ्याशी (ता. फलटण, जि. सातारा) शनिवारी रात्री २ वाजता मळीने भरलेल्या टँकरचालकाचे टँकरवरील (क्र. एमएच ०९ सीयु ८४५५) नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्याकडेला असलेल्या गोठ्यात घुसला. या अपघातात गोठ्यातील तीन जर्सी गाई ठार झाल्या असून टँकरचालक किरकोळ जखमी झाला आहे.

या अपघात प्रकरणी टँकरचालक दीपक दिलीप शिंदे (रा. बलवडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

या अपघाताचा अधिक तपास पो.ना. कदम करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!