दैनिक स्थैर्य | दि. १९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण जिमखाना, फलटण व फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती, फलटण आयोजित ‘फलटण क्रॉसकंट्री स्पर्धा २०२४’चे आयोजन रविवार, दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल, (सी.बी.एस.ई.) जाधववाडी, फलटण येथे सकाळी ६.०० वाजता करण्यात आले आहे.
Sound mind in a sound body या उक्तीनुसार मानवी जीवन आनंदी व समाधानी असण्यासाठी निरोगी मनाची आणि शरीराची आवश्यकता असते. शरीर निरोगी ठेवण्यात आहार व व्यायाम यांचा मुख्य वाटा असतो. देशाच्या जडणघडणीत युवकांचे असणारे योगदान लक्षात घेऊन शालेय विद्यार्थ्यांबरोबर संपूर्ण युवा पिढीला आरोग्याच्या चांगल्या सवयी लावण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व वयोगटातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजन समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या फलटण क्रॉसकंट्री स्पर्धेमधील वयोगट व अंतर खालीलप्रमाणे असणार आहे.
फन रेस
- १० वर्षा आतील (मुले व मुली ) – २ कि. मी.
- १५ वर्षे आतील (मुले व मुली ) – ३ कि. मी.
- १८ वर्षे आतील( मुले व मुली ) – ५ कि. मी.
- खुला गट – (पुरुष व महिला) – १० कि.मी.
- ३० वर्षापुढील ( पुरुष व महिला ) – ७ कि. मी.
- ४५ वर्षापुढील (पुरुष व महिला) – ५ कि. मी.
- ६० वर्षापुढील (पुरुष व महिला) – ३ कि. मी.
नावनोंदणी अंतिम तारीख २१ फेब्रुवारी २०२४ असणार आहे आणि नावनोंदणी केलेल्या स्पर्धकांनी प्रवेश फी जमा करून आपले चेस नंबर दि. २२ व २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.०० वा. ते दु. १.०० वा. या वेळेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण व श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल (सी.बी.एस.ई.) जाधववाडी, फलटण येथून घेऊन जावेत.
या स्पर्धेसाठी खालीलप्रमाणे पारितोषिक रोख रक्कम, मेडल, टी-शर्ट आणि प्रमाणपत्र असणार आहे.
खुला गट – (पुरूष/महिला)
प्रथम क्रमांकास – १०,००१/-
द्वितीय क्रमांक – ७००१/-
तृतीय क्रमांक – ५००१ /-
१८ वर्षे गट (मुले – मुली )
प्रथम क्रमांकास – ५००१/-
द्वितीय क्रमांक – ३००१/-
तृतीय क्रमांक – २००१ /-
१५ वर्षे गट (मुले – मुली), ३०, ४५ व ६० वर्षापुढील पुरूष/महिला
प्रथम क्रमांकास – ३००१/-
द्वितीय क्रमांक – २००१/-
तृतीय क्रमांक – १००१ /-
फन रेस -१० वर्षे गट (मुले – मुली )
सदर स्पर्धेमध्ये सहभागी होणेसाठी प्रवेश फी – १८ वर्षे गट (मुले – मुली ) यांना २० रु. आणि खुला गट, ३० वर्षे व ४५ वर्षे गट पुरुष व महिला यांना ५० रु. असणार आहे. १० वर्षे गट, १५ वर्षे गट मुले व मुली व ६० वर्षे गट महिला व पुरुष यांना प्रवेश फी असणार नाही.
वय निश्चितीसाठी जन्मतारखेचा दाखला व आधारकार्ड अनिवार्य आहे. जन्मतारीख २५ फेब्रुवारी २०२४ पर्यंतची ग्राह्य धरण्यात येईल. स्पर्धा रिपोर्टींग ५.३० वाजता असून या स्पर्धा ठिक ६.०० वाजता सुरू होतील.
चेस नंबर असल्याशिवाय स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
सदर स्पर्धा अंतर पूर्ण करणारे खेळाडू वय वर्षे १०, १५, १८ व खुला गट (महिला व पुरुष) यांना प्रमाणपत्र देण्यात येईल आणि ३०, ४५ व ६० वर्षापुढील पुरुष / महिला यांना शर्यत पूर्ण केल्याबद्दल मेडल देण्यात येईल.
रजिस्ट्रेशन करणेसाठी लिंक- =
https://forms.gle/43GCsDoUZgU76A1b6
अधिक माहितीसाठी संपर्क –
१) श्री. जनार्दन पवार – ९२८४७६५९९५
२) श्री. नामदेव मोरे – ९९६००८२१२०
३) श्री. सचिन धुमाळ – ९८९०३८२२०४
४) श्री. राज जाधव – ९२२६१३९६५३
५) डॉ. स्वप्नील पाटील – ७७०९०१६२९
६) श्री. तायाप्पा शेंडगे – ९३२२८४८१९९
७) श्री. उत्तम घोरपडे – ९४२११२१०३१
८) श्री. सूरज ढेंबरे – ८८०५७७७९९८
९) श्री. सुहास कदम – ७०८३७२०५२०
१०) श्री. अमित काळे – ९६६५५६९०९२