स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

वाई शहरात पाच घरफोडी करणार्‍या तिघांना अटक

वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाची कारवाई : चोेरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 17 हजार रुपये हस्तगत

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 24, 2021
in वाई - महाबळेश्वर - खंडाळा
ADVERTISEMENT

स्थैर्य, वाई, दि.२४: वाई शहरात पाच ठिकाणी घरफोडी करून 52 हजार रुपये लंपास करणार्‍या तिघांना वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाने अटक केली असून, सनी सुरेश जाधव (वय 26), अक्षय गोरख माळी (वय 20), सागर सुरेश जाधव (वय 24, सर्व रा. गुरेबाजार झोपडपट्टी, सिद्धनाथवाडी, ता. वाई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. संबंधित आरोपींकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 17 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

याबाबत वाई पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि. 22 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 8.30 ते दि. 23 फेब्रुवारी 2021 रोजी  9 वाजण्याच्या दरम्यान वाई शहरातील शशिकांत चंद्रकांत येवले (वय 28, रा. भोगाव, ता. वाई) यांच्या मालकीच्या आम्रपाली बिअर बार, 598, गणपतीआळी, वाई येथे असलेला बिअर बारचे बंद शटर उचकटून त्यांच्या कॅश काउंटरमधील 14 हजार 200 रुपये रोख रक्कम चोरी गेली आहे. सुशांत संतोष गोळे (वय 27, रा. बोरगाव, ता. वाई) यांच्या मालकीचे साईकृपा कृषी केंद्र, गणपतीआळी वाई नावाचे खताचे दुकानाचे बंद शटर उचकटून त्यांच्या कॅश काउंटरमधील 18 हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेली आहे. बिलाल इकबाल बागवान (वय 30, रा. गणपतीआळी, वाई) यांच्याकडील 11 हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेली आहे तर रविचंद्र प्रदीप भाटे (वय 42, रा. मधलीआळी, वाई) यांच्या मालकीचे भाटे दूध डेअरीचे बंद शटर उचकटून त्यांच्या कॅश काउंटरमधील 300 रुपये रोख रक्कम व 3 आइसस्क्रीमचे बॉक्स असा 1800 रु. किमतीचा माल चोरीस गेला आहे. नितीन रवींद्र शिंगटे (वय 45, रा. विराटनगर, वाई) यांच्या मालकीचे अष्टविनायक फार्मा नावाच्या दुकानाचे बंद शटर उचकटून त्यांच्या कॅश काउंटरमधील 7 हजार रोख रक्कम चोरीस गेली आहे. या घरफोडी, चोरीबाबत वाई पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या घरफोडी-चोर्‍यांची माहिती वाईचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना मिळताच त्यांनी वाई पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचार्‍यांना तत्काळ आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबतच्या सूचना दिल्या. गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी संशयित आरोपींचा शोध घेत असतानाच पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरच्या सर्व चोर्‍या गुरेबाजार झोपडपट्टी वाई येथील तीन मुलांनी केलेल्या आहेत.त्यानंतर पोलीस निरीक्षक यांनी सदरची माहिती गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचार्‍यांना देऊन आरोपींना तत्काळ पकडण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचार्‍यांनी सदर आरोपींची माहिती प्राप्त करून त्यांना वाई शहरात फिरत असताना ताब्यात घेतले. सदर आरोपींनी वरील पाचही चोर्‍याा केल्याचे कबूल केले असून, त्यांच्याकडून आत्तापर्यंत चोरलेल्या रोख रक्कमेपैकी 17 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. उर्वरीत रक्कम हस्तगत करण्याच्यादृष्टीने तपास चालू आहे.

या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे- खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांचे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, कृष्णराज पवार, पो. कॉ. सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अक्षय नेवसे यांनी सहभाग घेतला होता.


ADVERTISEMENT
Previous Post

तहसील कार्यालयातील अभिलेख लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

Next Post

भारत vs इंग्लंड : एलईडीच्या लख्ख प्रकाशझाेतामध्ये सामने; पावसानंतर अवघ्या ३० मिनिटांत खेळ सुरू

Next Post

भारत vs इंग्लंड : एलईडीच्या लख्ख प्रकाशझाेतामध्ये सामने; पावसानंतर अवघ्या ३० मिनिटांत खेळ सुरू

ताज्या बातम्या

फलटण तालुक्यातील सहा संशयितांची अहवाल कोरोनाबाधित

March 9, 2021

कोरोना प्रतिबंधक लस घ्या; लस सुरक्षित आहे : श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर

March 9, 2021

जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी; मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांचे आवाहन

March 9, 2021

गोखळी येथे जंतनाशक गोळ्या वाटप

March 9, 2021

महिलादिनी शेरेचीवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोनायोद्ध्या रणरागिणींचा सन्मान

March 9, 2021

सोनगाव येथील ऐतिहासिक वेताळबाबा परिसराची ग्रामस्थांकडून स्वच्छता

March 9, 2021

कुस्तीमध्ये फलटणचे नाव देशपातळीवर पोहचवा : श्रीमंत संजीवराजे; क्रीडा संकुलात महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

March 9, 2021

बसाप्पा पेठेतील अतिक्रमणांवर पुन्हा कारवाई, पालिकेने केली धडक कारवाई

March 9, 2021

आरटीओ चौकात अज्ञातांकडून टपर्‍यांची तोडफोडदोन लाखांचे नुकसान : व्यावसायिकांमध्ये खळबळ

March 9, 2021

भूखंड हडप करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

March 9, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.