धारदार शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी तिघांना अटक


स्थैर्य, वाई, दि.१८: येथील औद्योगिक वसाहतीतील चांदणी चौकात पूर्ववैमनस्यातून व जुन्या भांडणाचा राग मनात धरून रविवार पेठ येथील अक्षय नंदकुमार निकम (वय 25) याच्यावर धारदार शस्त्राने वार करणार्‍या तिघांना पोलिसांनी खंडाळा येथून ताब्यात घेतले. अमन इस्माईल सय्यद शेख, संग्राम प्रकाश शिर्के, ऋतिक उर्फ सौरभ प्रल्हाद गाढवे (सर्व रा. बोपर्डी) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांची रवानगी पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने रवानगी केली आहे.

एकावर औद्योगिक वसाहतीतील चांदणी चौकात सोमवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान तिघांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अक्षय नंदकुमार निकम याच्यावर धारदार शस्त्राने वार केले तर धीरज दगडे हा गंभीर जखमी झाला होता. अक्षय निकम याच्यावर सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. याप्रकरणी मंगळवारी संध्याकाळी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितल जानवे खराडे व पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलिसांनी खंडाळा येथून अमन इस्माईल सय्यद शेख (वय 21, रा. बोपर्डी )संग्राम प्रकाश शिर्के(वय 27,रा म्हसवे ता जावळी, हल्ली रा. बोपर्डी) ऋतिक उर्फ सौरभ प्रल्हाद गाढवे (वय 21,सर्व रा बोपर्डी) यांना खंडाळा येथून ताब्यात घेतले. यानंतर केलेल्या चौकशीत संशयितांनी मागील काही वर्षांपासून सुरू असणार्‍या वादातून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून धारदार शास्त्राने वार केल्याचे कबूल केले. या कारवाईत भाऊसाहेब धायगुडे, सुभाष धुळे, प्रशांत शिंदे, सोमनाथ बल्लाळ, अजित जाधव, विजय शिर्के आदींनी सहभाग घेतला. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे अधिक तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!