राजुरी परिसरात चोर्‍यांचे सत्र सुरूच; घरफोडीत लाखोंचा माल लंपास


दैनिक स्थैर्य | दि. १7 नोव्हेंबर २०२३ | फलटण |
राजुरी व परिसरात चोर्‍यांचे सत्र काही थांबत नसल्याचे दिसत आहे. येथे चौथ्या टप्प्यात झालेल्या घरफोडीत मोबाईलसह लाखोंचा माल गुरुवारी रात्री चोरट्यांनी लंपास केला आहे.

श्री. रमेश रघुनाथ घाडगे, रा. बागेवाडी (बरड) यांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने, तीस हजार रूपये रोख रक्कम पळविली आहे, तर दुसरीकडे त्याच रात्री राजुरी येथील लालासाहेब गुलाबराव माळवे यांचे दोन मोबाईल चोरीस गेले आहेत.

दरम्यान, या चोरीवेळी घरातील इतर सामान उचकटताना चोरांची व माळवे यांची झटापट झाल्याचे समजते आहे. चोर बरमुडाधारी आहेत तर अनिल गावडे-खलिपे यांचीही थोडीफार कॅश चोरीला गेल्याचे समजले आहे.

इतके दिवस बंद घराची चोरी होत होती. आता मात्र घरात लोक असूनही चोरी होतेय, हा चिंतेचा विषय बनला आहे.


Back to top button
Don`t copy text!