‘या’ कंपन्या देणार मागील वर्षीपेक्षा जास्त पगारवाढ; यंदा चीन आणि अमेरिकेपेक्षा जास्त पगारवाढ भारतात


स्थैर्य, दि. २४: भारत देशात नोकरी व्यवसाय करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आंनदांची बातमी आहे. भारतीय कंपन्या यंदा आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 7.7 टक्यांची वाढ करू शकतात. कंपनीत चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 60 टक्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. हे एका ग्लोबल प्रोफेशनल फर्म एऑन (Aon) कंपनीच्या सर्वेमधून समोर आले आहे. भारतीय कंपन्यांनी 2020 मध्ये सरासरी 6.4 टक्यांनी पगारवाढ केली होती.

चीन, अमेरिकेपेक्षा जास्त पगारवाढ भारतात

या रिपोर्टनुसार, जापान, अमेरिका, चीन, सिंगापूर, जर्मनी आणि युके देशातील कर्मचाऱ्यांच्या पगारात 3.1 टक्यांनी वाढ होऊ शकते. ही भारताच्या तुलनेत कमी आहे.

ई-कॉमर्स आणि व्हेंचर कॅपिटल फॅर्म्स करू शकते जास्त पगारवाढ

क्षेत्रानुसार बघितले तर ई-कॉमर्स आणि व्हेंचर कॅपिटल फर्म्स कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 10.10% वाढ करतील. त्यानंतर, टेक कंपन्या 8.8%, आयटी कंपन्या 8.1%, मनोरंजन आणि गेमिंग कंपन्यांचा समावेश आहे. केमिकल आणि फार्मा कंपन्यादेखील आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 8% टक्यांनी वाढ करतील.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, प्रोफेशनल सर्व्हिस सेक्टर आणि अर्थ संस्थानमध्ये अनुक्रमे 7.9% आणि 6.5% वाढ करण्यात येणार आहे. हा सर्वे 1200 कॉर्पोरेट हाऊसच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

या क्षेत्रात सर्वात कमी पगारवाढ

हॉस्पिटॅबिलिटी, इन्फ्रास्ट्रक्चर, रिटेल आणि अभियांत्रिकी आदी क्षेत्रावर कोरोनामुळे जास्त परिणाम झाला आहे. त्यामुळे, या क्षेत्रात सरासरी 5.5 ते 5.8% पर्यंत पगारवाढ होऊ शकते.

कोरानामुळे सावरत आहे देश
ग्लोबल प्रोफेशनल फर्मच्या अवहालानुसार, 2021 मध्ये 93.5% कंपन्यांनी चांगल्या व्यवसायाची अपेक्षा केली होती. यामाध्यमातून ते आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करू शकले असते. दुसरीकडे 6.5% लोकांना वाटते की, कंपन्यांचा यावर्षीचा व्यवसाय चांगला राहणार नसून ते पगारवाढीपेक्षा कर्मचाऱ्यांची नोकरी टिकवण्यावर लक्ष देतील. देशातील 60% कंपन्यांना वाटते की, मागील वर्षीपेक्षा यावर्षीची स्थिती चांगली असून ते यामाध्यमातून आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 9.1% वाढ करू शकतील.


Back to top button
Don`t copy text!