
दैनिक स्थैर्य | दि. 10 जून 2025 | फलटण | फलटण शहरांमध्ये व उपनगरामध्ये आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत महावितरणच्या माध्यमातून वीजपुरवठा हा खंडित करण्यात आला आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा येणाऱ्या काही दिवसांमध्ये फलटण मधून मार्गस्थ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या माध्यमातून देखभाल दुरुस्तीसाठी आज वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
गतकाही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे व त्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ व पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी पालखी मार्गाची व पालखी तळाची पाहणी केली होती.
त्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या माध्यमातून देखभाल दुरुस्तीसाठी आज वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.