
दैनिक स्थैर्य | दि. 10 जून 2025 | फलटण | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आज पुणे येथे दिमाखात वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहे.
यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे स्वागताचे बॅनर झळकलेले आहेत.
तालुका व जिल्हा पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे सक्रिय दिसून येत नाहीत.
परंतु पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमांमध्ये आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बॅनर झळकल्याने फलटण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेले आहे.