
दैनिक स्थैर्य । 10 जून 2025 । फलटण । उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन पुणे येथे मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. यासाठी जिल्हा बँकेचे संचालक तथा तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांच्या नेतृत्वात फलटण येथून शेकडो कार्यकर्ते पुणेकडे रवाना झाले आहेत.
फलटण तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारांचा आहे. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर फलटण तालुक्याने विश्वास ठेवला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवत फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे फलटण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यावर निष्ठा ठेवत वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सामील होत आहोत, असे मत यावेळी श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी यावेळी व्यक्त केले.
पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा शिवछत्रपती खेळा संकुल बालेवाडी येथे होत असल्याने फलटण तालुक्यातील ही शेकडो कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी रवाना झाले आहे.
फलटण शहर व फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातून शेकडो कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत.