दुधेबावी ग्राम तलावातून दहा ब्रास वाळूची चोरी


दैनिक स्थैर्य | दि. १८ मे २०२३ | फलटण |
दुधेबावी (ता. फलटण) गावच्या हद्दीत दुधेबावी-गिरवी जाणार्‍या रोडलगत असणारा ग्राम तलाव येथून अज्ञात इसमाने अंदाजे दहा ब्रास वाळू बिगरपरवाना उत्खनन करून चोरून नेली असल्याची तक्रार तलाठी राहुल इंगळे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.

या चोरीची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. १५ मे रोजी रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास दुधेबावी (ता. फलटण) गावच्या हद्दीत दुधेबावी-गिरवी जाणार्‍या रोडलगत असणार्‍या ग्रामतलाव येथून अज्ञात इसमाने ५० हजार रूपये किमतीची अंदाजे १० ब्रास वाळू उत्खनन करून चोरून नेली आहे, अशी तक्रार फलटण ग्रामीण पोलिसात तलाठी राहुल इंगळे यांनी दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहा. पोलीस फौजदार खाडे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!