कुरवली खुर्द येथील प्रकल्पाच्या शासकीय अधिगृहीत जमिनीतून ५४० ब्रास मुरूमाची चोरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ४ मे २०२३ | फलटण |
वाखरी व कुरवली खुर्द, तालुका फलटण, जिल्हा सातारा गावच्या हद्दीत असणारी प्रकल्पाच्या शासकीय अधिगृहीत जमिनीतून सुमारे ५४० ब्रास मुरूमाची चोरी केल्याची तक्रार फलटण पाटबंधारे कार्यालयाचे शाखाधिकारी तेजस पवार यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.

या घटनेची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. १२ जानेवारी २०२३ ते दि. २० एप्रिलज २०२३ रोजीच्या दरम्यान कुरवली खुर्द गावच्या हद्दीतील प्रकल्पाच्या शासकीय अधिगृहीत जमिनीतून सुमारे ५४० ब्रास मुरूमाची चोरी कोणीतरी अज्ञात चोरट्याने केली आहे, अशी तक्रार फलटण पाटबंधारे खात्याचे शाखाधिकारी तेजस पवार यांनी पोलिसात दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो.ना. जगदाळे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!