
दैनिक स्थैर्य । 15 मे 2025। फलटण । स्वराज्याच्या रक्षणासाठी स्वतःचे बलीदान देणार्या छत्रपती संभाजी महाराजांचे विचार तरुणांनी आत्मसात करावेत, असे प्रतिपादन युवा व्याख्याते प्रा.रवीकुमार ठावरे यांनी केले.
मौजे सासकल ता.फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या छत्रपती संभाजीमहाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात तेे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणुन मातोश्री विकास सेवा सोसायटीचे चेअरमनमोहनराव डांगे होते.
प्रा.रवीकुमार ठावरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचे बलिदान देऊन जगासमोर आदर्श निर्माण केला. धर्म रक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य फार मोठे आहे. त्यांच्या जीवनाकडे पाहुन महाराष्ट्रातील आजच्या तरुणाईने प्रेरणा घ्यावी यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास उलघडला.
यावेळी सासकल, भाडळी खुर्द, भाडळी बुद्रुक येथील ग्रामस्थ तसेच महिलावर्ग उपस्थित होते. प्रशांत मुळीक यांनी स्वागत केले. ह.भ.प.गौरव महाराज मुळीक यांनी आभार मानले.