धुळदेव विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के


दैनिक स्थैर्य । 15 मे 2025। फलटण । धुळदेव, ता. फलटण येथील रयत शिक्षण संस्थेचे श्रीमान शेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालयाने दहावीत परीक्षेची 100% निकालाची परंपरा कायम ठेवली.

या परीक्षेत मयुरी अनिल नाळे हिने 96.60% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. सिद्धी किरण धर्माधिकारी हिने 92% गुण मिळवत दुसरा,तर आरती अभिमन्यू ढोपरे हिने 89% गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला.शाळेतील एकूण 15 विद्यार्थ्यांना डिश्टिंगशन मिळाले. 30 विद्यार्थी ग्रेेड 1, 12 विद्यार्थ्यांना ग्रेेड 2, तर 04 विद्यार्थी पास झाले.

या यशाबद्दल स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ, सरपंच व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!