बलकवडी धरणावर सेल्फी काढण्याच्या नादात युवकाने गमावला जीव

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, वाई, दि. 22 : पसरणी, ता. वाई येथील 22 वर्षीय अजय विजय महांगडे या युवकाचा बलकवडी धरणावर सेल्फी काढताना पाय घसरून सांडव्यावरून पडून जागीच मृत्यू झाला. दुपारी 3.30 च्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पसरणी येथील अजय महांगडे व 7 जण बलकवडी धरणावर फिरण्यासाठी गेले होते. दुपारी 3.30 च्या सुमारास धरणावरील सिक्युरीटी गार्ड जेवायला गेला असताना सदर युवक सांडव्या नजीक सेल्फी घेत होते. यावेळी अजय सेल्फी घेण्यासाठी सांडव्याच्या नजीक गेला. निसरड्या जागेवरून पाय घसरल्याने तो सांडव्यावरून खाली पडला. यावेळी सांडव्यातून पाण्याचा विसर्गही सुरू होता. अजयच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलीस ठाण्यास समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सांडव्यातील पाणी पूर्णपणे बंद करून स्थानिक युवकांच्या सहाय्याने रोप व ट्यूबच्या मदतीने त्याचा मृतदेह सायंकाळी 6 च्या सुमारास सांडव्यातून बाहेर काढण्यात आला. अजय हा प्लंबिंगची कामे करत होता. सुस्वभावी असल्याने त्याचा मित्र परिवार मोठा होता. सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!