फलटणकरांसाठी नाना पाटील चौकातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या परिसरात फटाका स्टॉल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण शहरामध्ये दरवर्षी फलटण फटका असोसिएशनच्या वतीने फटका स्टॉल लावण्यात येत असतात. गतकाही वर्षांपासून इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन येथे फटाका स्टॉल लागत होते; परंतु त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा झाल्यामुळे मागील वर्षी लॉ कॉलेज रोड येथे फटाका स्टॉल बसवण्यात आले होते. यावर्षी निवडणूक असल्याने लॉ कॉलेज रोड येथे असणार्‍या फटाका स्टॉलला नगरपरिषदेच्या वतीने परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे नाना पाटील चौक येथे असणार्‍या श्री यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या आवारामध्ये सर्व फटाका स्टॉल बसवण्यात आलेले आहेत, अशी माहिती फलटण फटाका असोसिएशनने दिली आहे.

फलटणकर नागरिकांनी फटाके खरेदीसाठी नाना पाटील चौक येथील श्री यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या परिसरामध्ये फटाका स्टॉलमधून फटाके खरेदी करावेत, असे आवाहन फटाका असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!