ट्रान्सफॉरमधून तार चोरली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, सातारा, दि.२: वडूथ (ता.सातारा) येथील जननी नावाच्या शिवारात असलेल्या विद्यूत वितरण कंपनीच्या ट्रान्सफार्मरमधून २५ हजार रुपये किमतीची ४५ किलो तांब्याची तार चोरल्यानंतर चोरट्यांनी ऑइल मुद्दामून सांडून नुकसान केले. याप्रकरणी सचिन सुभाष वाघमळे (रा.सदरबझार,सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, वडूथ गावच्या हद्दीतील जननी नावाच्या शिवारात असलेला विद्युत वितरण कंपनीच्या मालकीचा ट्रान्सफार्मर बसवला होता. त्यातून दि.१ रोजी अज्ञात चोट्याने ४५ किलो वजनाची तांब्याची तार चोरून नेली. चोरट्यांनी तार चोरून नेताना ट्रान्सफार्मरमधील २०० लीटर ऑईल जमिनीवर सांडून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार जाधव हे करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!