स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहिवडी पोलीस दलातील राजाच्या भुजात ३२ गावांचे बळ

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
दहिवडी पोलीस दलातील राजाच्या भुजात ३२ गावांचे बळ
ADVERTISEMENT


दहिवडी येथे आयोजीत गणेश मंडळांच्या बैठकीत आवाहन करताना स.पो.नि. राजकुमार भुजबळ.

स्थैर्य, म्हसवड दि.१९ (महेश कांबळे) : कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय कार्यालयाचा प्रमुख हा त्या कार्यालयाचा राजा असतो त्या कार्यालयात त्या राजाचाच आदेश चालतो वा त्या राजाच्या आवाहनाला प्रतिसादही त्या कार्यक्षेत्रातील सामान्य जनता देते हे दहिवडी पोलीस दलाने दाखवुन दिले असुन या दलाच्या राजाने केलेल्या आवाहनाला हद्दीतील ३२ गावाने एकमुखी पाठींबा दर्शवत आपल्या गावात एक गाव एक गणपती बसवण्याचा निर्णय घेत पोलीस दलाचा सन्मान जिल्ह्यात वाढवताना या दलाच्या प्रमुखाच्या भुजात ३२ गावचे बळ दिल्याचे अधिरोखीत केले आहे.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर यंदा होवु घातलेला गणेश उत्सव अत्यंत साधे पध्दतीने करण्याबरोबरच प्रत्येक गावाने एक गाव एक गणपती बसवावा यासाठी जिल्हा पोलीस व प्रशासन प्रयत्न करीत असुन त्यांच्या या प्रयत्नाला माण तालुक्यात चांगलेच यश मिळत असल्याचे दिसुन येत आहे, म्हसवड व दहिवडी ही तालुक्यातील दोन महत्वाची पोलीस स्टेशन असुन या पोलीस स्टेशन हद्दीतील जास्तीत जास्त गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवावी यासाठी दोन्ही पोलीस स्टेशन कडुन निकराचे प्रयत्न सुरु असुन त्यासाठी दोन्ही स्टेशन च्या प्रमुखांनी गावोगावी बैठका घेत ग्रामस्थांना आव्हान करताना दिसत आहेत. पोलीसांच्या या आवाहानला अनेक गावांनी सकारात्मक प्रतिसाद देत यंदाचा गणेशोत्सव हा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा एकमुखी निर्णय घेत पोलीसांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट जरी असले तरी गणेश उत्सव हा होणारच आहे. श्री गणेश ही बुध्दीची देवता मानली जात असली तरी तो विघ्नहर्ता म्हणुनही ओळखला जातो त्यामुळे यंदा संपुर्ण जगासमोर विघ्न निर्माण करणार्या कोरोनाचा सर्वनाश हा विघ्नहर्ताच करु शकतो ही भावना सर्व गणेश भक्तांमध्ये असल्यानेच कोरोनाच्या या महामारीतही गणेश भक्तांचा उत्साह कायम आहे. मात्र गणेश उत्सव साजरा करताना आपणही प्रशासनाला सहकार्य करुन या महामारी ला आपल्या गावापासुन दुर ठेवायचे असा दृड निश्चय गावोगावी होत असलेल्या बैठकीतुन व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील जास्तीत जास्त गावात एकच गणपती बसवावा यासाठी पोलीस व प्रशासन प्रयत्न करीत आहेत. माण तालुक्यात दहिवडी पोलीस स्टेशन ने यामध्ये बाजी मारत ३२ गावात एक गाव एक गणपती बसवण्याचे जाहीर केले असुन ये – त्या दोन दिवसात हा आकडा आणखी काही वाढण्याची शक्यता या दलातील पोलीस कर्मचार्यांकडुन व्यक्त होत आहे. दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रमुख असलेले राजकुमार भुजबळ हे यासाठी खुप प्रयत्नशिल आहेत त्यांच्या या प्रयत्नामुळेच दहिवडी सारख्या महत्वाच्या शहरातही एकच गणपती बसवण्याचा एकमुखी निर्णय नागरीकांनी घेतला आहे, अर्थातच भुजबळ यांच्या या प्रयत्नाला दहिवडीतील राजकिय, सामाजीक व सुजान नागरीकांची साथ ही तितकीच मोलाची लाभल्यानेच हे शक्य झाले असले तरी दहिवडी सोबत इतर ३१ गावांनीही असाच निर्णय घेत पोलीस दलाचे बळ वाढवल्याचे दिसुन येते. दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ६५ गावे येत असुन या गावात कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम स.पो.नि. राजकुमार भुजबळ हे चोखपणे बजावण्याचे काम करीत असल्यानेच या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ५० टक्के गावांनी पोलीस अधिकारी असलेल्या भुजबळ यांच्या भुजात बळ भरण्याचे काम केले असुन माणवासियांनी भुजबळ यांना दिलेले बळ निश्चीतच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अधिकचे बळ देणारे ठरणार एवढे मात्र निश्चित.

म्हसवड पोलीस स्टेशनचा श्री. गणेशा –

म्हसवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत लहान – मोठी व वाड्या मिळुन ७९ गावे येतात या सर्व गावातील प्रमुखांशी म्हसवड पोलीस स्टेशन चे स.पो.नि. गणेश वाघमोडे यांनी चर्चा करुन त्यांना एक गाव एक गणपती ही संकल्पना अंमलात आणण्याचे आवाहन केले असुन यापैकी ३० गावांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने म्हसवड पोलीस स्टेशन ने ही श्री. गणेशा चांगलाच केला असल्याचे दिसुन येते.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: सातारा
ADVERTISEMENT
Previous Post

वित्तीय क्षेत्राच्या नेतृत्वात सेन्सेक्सने घेतली ४७७ अंकांची उसळी

Next Post

मनोहर कुईगडे यांचे निधन

Next Post
मनोहर कुईगडे यांचे निधन

मनोहर कुईगडे यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

भारतात या वर्षात वेगानेवाढेल सोन्याची मागणी, कोरोना लसीकरणात स्थिती बदलेल

सोन्याच्या दरात पुन्हा घसरण

January 18, 2021
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. ‌चंद्रकांतदादा पाटील यांचा ठाम पुनरुच्चार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना शिवसेनेकडून त्यांच्या मूळ गावात धक्का, नऊपैकी सहा जागांवर विजय

January 18, 2021
नगरपंचायतीचा दर्जा देवून कोळकीचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवूयात : श्रीमंत संजीवराजे

फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ७८ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत राजेगटाचे वर्चस्व : श्रीमंत संजीवराजे

January 18, 2021
वादाच्या भोव-यात ‘तांडव’ : वेब सीरिजविरोधात लखनौत FIR दाखल

वादाच्या भोव-यात ‘तांडव’ : वेब सीरिजविरोधात लखनौत FIR दाखल

January 18, 2021
सोलापूर : पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार

सोलापूर : पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार

January 18, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

66 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

January 18, 2021
उमेदवारांनी ऑनलाईन उमेदवारी अर्जासोबतचे शपथपत्र नोटरी करुन सादर करावे: तहसीलदार समीर यादव

निंबळकला प्रसिद्ध उद्योजक राम निंबाळकर यांची सत्ता अबाधित

January 18, 2021
उमेदवारांनी ऑनलाईन उमेदवारी अर्जासोबतचे शपथपत्र नोटरी करुन सादर करावे: तहसीलदार समीर यादव

निंभोरेत मुकुंद रणवरे विजयी; अमित रणवरे पराभूत

January 18, 2021
उमेदवारांनी ऑनलाईन उमेदवारी अर्जासोबतचे शपथपत्र नोटरी करुन सादर करावे: तहसीलदार समीर यादव

गुणवरे ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर; ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव विजयी

January 18, 2021
उमेदवारांनी ऑनलाईन उमेदवारी अर्जासोबतचे शपथपत्र नोटरी करुन सादर करावे: तहसीलदार समीर यादव

जाधववाडी (फ) ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर

January 18, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.